Gudi Padwa 2026 Nagpur CM Fadnavis : उपराजधानीत भव्य शोभायात्रेचं आयोजन; मुख्यमंत्री फडणवीसांकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्यानिमित्त मुंबईसह आसपासच्या शहरांमध्ये नववर्ष स्वागतयात्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

Gudi Padwa 2026 Nagpur CM Fadnavis : उपराजधानीत भव्य शोभायात्रेचं आयोजन; मुख्यमंत्री फडणवीसांकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

आज सर्वत्र गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. हिंदू संस्कृतीमध्ये गुढीपाडव्याचा सण हा केवळ एका नव्या वर्षाचा आरंभ नसून तो विजय, सृष्टीची निर्मिती आणि आरोग्याचा संदेश देणारा एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो. यंदा गुढीपाडवा गुरुवार 19 मार्च 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्यानिमित्त मुंबईसह आसपासच्या शहरांमध्ये नववर्ष स्वागतयात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. नागपुरातील तात्या टोपे नगर गणेश मंदिर ते लक्ष्मीनगर चौकपर्यंत शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी पारंपरिक महाराष्ट्रीय वेशभूषेत सजलेले हजारो नागरिक यात सहभागी झाले आहेत. 

हेही वाचा-Raj Thackeray: शिवतीर्थावर आज ‘राज’गर्जना! ठाकरे बंधूंच्या युतीनंतरचा पहिलाच गुढीपाडवा मेळावा; भाषणातून कोण होणार लक्ष्य?
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शोभायात्रेत दाखल झाले असून ते पायी चालत शोभायात्रेत भ्रमण करताना पाहायला मिळत आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी फडणवीस म्हणााले की, “दरवर्षीप्रमाणे आज आपण नववर्ष साजरे करण्यासाठी आलो आहे. गुढीपाडवा प्रत्येक हिन्दु, मराठी माणसाकरिता महत्वाचे आहे. नवीन संकल्प घेऊन पुढे जातो… आपली पहाट मंगलमय व्हावी म्हणून या शोभायात्रेचे आयोजन करितो, परिसर भगवा झालेला पाहतो आहे. आपला ढोल पथक,मल्लखांब करणाऱ्या मुली मुलं असतील या सर्वांनी सुंदर कार्यक्रम यशस्वी केला आहे , त्यांचे कौतुक करितो. ही आपली भारताची गुढी आहे,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ही गुढी उंचच उंच जावो.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number